Tuesday, 28 April 2020

मनाचा सारथी....

 महाभारतातील प्रसंगातुन खरंच खूप घेण्यासारख आहे. भगवान श्री कृष्ण शयन करत असताना प्रथम दुर्योधन व नंतर अर्जुन तिथे येतो. दुर्योधन कृष्णाच्या डोक्याशी बसतो आणि अर्जुन पायाशी. श्रीकृष्णाची निद्रा पूर्ण होताच समोरच पायाशी बसलेला अर्जुन प्रथम दर्शनी दिसतो. श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो  “हे पार्थ, तू केव्हा आला?" त्याच वेळी दुर्योधन उत्तरतो "मी अर्जुनाच्या आधी आलोय. जसा पार्थ तुझा मित्र आहे तसा मी ही आहे. होणारे युद्ध अटळ आहे, त्यामुळे मला मागण्याच्या आधिकार पहिला आहे". त्यावेळी श्रीकृष्ण उच्चारता की "नाही प्रथम अधिकार तर अर्जुनाचा आहे,तो तुझा अनुज आहे. एकीकडे माझी नारायणी सेना आहे,आणि दुसरीकडे  मी स्वतः. मी स्वतः तर काय युद्धात भाग घेणार नाही. शस्त्र देखील उचलणार नाही. मग ठरवा त्तुम्हीच?" त्यावर अर्जुन बोलतो की “हे मधुसूदन मी तर काहीच मागायला आलो नव्हतो. जर द्यायचे असेल तर मला तुझ्याव्यातिरिक्त अजुन कोणी नकोच." यावर दुर्योधन मनोमन प्रसन्न होऊन  नारायणी सेना घेऊन जातो. नंतर भगवान श्री कृष्ण पुन्हा अर्जुनाला विचारतात की “तू मलाच का निवडले माझी नारायण सेना का नाही"? त्यावर अर्जुन बोलतो की “हे कृष्ण मला तू सारथी म्हणून हवा आहेस,युद्धात योध्यापेक्षा सारथीला महत्त्व आहे. तू जर माझा सारथी असेल तर मी हे युद्ध न डगमगता निश्चित जिंकेल. अत: तू माझा सारथी हो."
तात्पर्य ऐवढेच की आपल्या ही जीवनाचा सारथी उत्तम आणि कुशल असेल तर जगातील कुठलेही युद्ध आपण नक्की न डगमगता जिंकू शकतो.
🚩जय श्री कृष्ण 🚩
                                                                    🖋स्वानंद आकसाळ,
                                                                        श्रीरामपुर,अहमदनगर(महा.)
                                                                        मो. ७७०९९९७७८३

                              

7 comments:

बाळकृष्ण...

#बाळकृष्ण  लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि "कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्य...