Monday, 18 May 2020

पावसाची धून...

आभाळाच्या तोंडाला
सुटलय वाटतं पाणी
दिवाळीचा फराळ याला 
आणुन द्या रे कुणी

मुदत पावसाची
आली होती सरत
फराळाच्या वासाने
आला वाटतं परत

उचला रे आता
अंथरलेल्या पायघड्या
बोळवण करा याची
देऊन बेसनवड्या

हिवाळा आगंतुक
पाऊसही जाईना
हवामान खात्याचेही
डोके चालेना

पावसाच्या ऋणातून
होता येईना उतराई
दोन पाहुण्यांची पण
कशी करावी सरबराई

आठवते एजाज
डॉक्टरची चिट्ठी
सकाळ दुपार संध्याकाळ
वेगवेगळी घुट्टी

सकाळी असावे हीव
दुपारी पडावे ऊन
संध्याकाळी ऐकावी
मस्त पावसाची धुन

रहा तिघेही कायमचे
करीत येथे नर्तन
रहा पाहुण्यासारखे
नको अतिरेकी वर्तन.

               @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३.


No comments:

Post a Comment

बाळकृष्ण...

#बाळकृष्ण  लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि "कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्य...