Thursday, 21 May 2020

मस्त पैकी जगा...

पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात येतील
म्हातारपणाच्या काठ्या 

जोरजोरात बोलावं लागेल 
होशील ठार बहिरा
मसणात गवऱ्या गेल्यावर
आणतो का तिला गजरा ?

तोंडात कवळी बसवल्यावर
कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर
डोंगर चढता येईल का ?

अरे बाबा जागा हो
टाक दोन दिवस रजा 
हसी मजाक करत करत 
मस्तपैकी जगा

दाल-बाटी,भेळपुरी
आईस्क्रीम सुद्धा खा
आरोग्य उत्तम राहण्यासाठी 
शहरा बाहेर फिरायला जा

बिझी बिझी काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो 
संसाराचा गाडा....

                    @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                        श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३.

Monday, 18 May 2020

पावसाची धून...

आभाळाच्या तोंडाला
सुटलय वाटतं पाणी
दिवाळीचा फराळ याला 
आणुन द्या रे कुणी

मुदत पावसाची
आली होती सरत
फराळाच्या वासाने
आला वाटतं परत

उचला रे आता
अंथरलेल्या पायघड्या
बोळवण करा याची
देऊन बेसनवड्या

हिवाळा आगंतुक
पाऊसही जाईना
हवामान खात्याचेही
डोके चालेना

पावसाच्या ऋणातून
होता येईना उतराई
दोन पाहुण्यांची पण
कशी करावी सरबराई

आठवते एजाज
डॉक्टरची चिट्ठी
सकाळ दुपार संध्याकाळ
वेगवेगळी घुट्टी

सकाळी असावे हीव
दुपारी पडावे ऊन
संध्याकाळी ऐकावी
मस्त पावसाची धुन

रहा तिघेही कायमचे
करीत येथे नर्तन
रहा पाहुण्यासारखे
नको अतिरेकी वर्तन.

               @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३.


मन की बात..

बात तो अपने मन की करते है,
जिंदगी को अपने अनुभव से भरते है
मन ही मन उसपर मरते है
लाखो सवाल है दिल में 
क्या तुमसे कोई अपने दिलों में हमदर्दी रखते है?

शायद, शायद यही बात तुमने कहीं होती
मेरे दिल में तुम्हारी जीत होती
छुपा लेता में तुम्हे इस कदर 
उस भीड़ भरी तानो से
शोर लहरो की सुनाई देती उन तूफानों से।

मै आज भी वही खड़ा हूं 
अपनी ही जिद पे अडा हूं।
खुद ही हसता खुद ही रोता
तुम्हारी उम्मीद पर हर दिन जीता।
क्या बताऊं तुम्हे ना परवाह
जमाने दुनिया की करते है
हम खुद के साथ दिल्लगी से रहते है।

                   @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३.

*आपली माणस..*

*आपली माणस....* 

आवक झाली जास्त 
अन माणसं झाली कमी 
कोणतीच वस्तू देत नाही 
सुख-शांतीची हमी !!

पॅकेज झालं मोठं 
अन सुख झालं लहान 
माणसाला माणसाचीच 
लागली पाहिजे तहान !!

मोकळं चाकळं बोलण्यासाठी
पैसे थोडेच लागतात 
कशासाठी आपली माणसं
अंतर ठेऊन  वागतात !!

एवढं जग फिरतोस तू 
मायेची माणसं भेटतात का 
खांद्यावर हात ठेऊन 
तुझ्याशी काही बोलतात का ?!!

सुबत्ता आली म्हणजे 
पाय आपला घसरू नये
आपलं गाव आपली माणसं
कधीच कुणी विसरू नये !!

साहेब होणं सोपं असतं 
माणूस होता आलं पाहिजे 
बहीण अन भावासाठी 
मन व्याकुळ झालं पाहिजे !!

ट्रेन सुद्धा म्हणे आता 
' बुलेट ' सारखी होणार आहे 
काय माहीत हरवलेली 
मजा कधी येणार आहे !!

नकाशा तर तोच आहे 
गाव का रे सापडत नाही
लपणा-छपनी, धप्पा-कुटी 
काहीच कसं आठवत नाही !!

पोट भरण्यासाठी आपण
आपलं गाव सोडलं पाहजे 
याचा अर्थ असा नाही की 
नातं सुद्धा तोडलं पाहिजे !!

अरे  फक्त  पैशांनी 
सगळीच प्रश्न सुटत नसतात 
धीराचे शब्द देण्यासाठी 
आपली माणसंच लागत असतात !!

                 @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३.





Friday, 15 May 2020

आयुष्याची भेळ....

आयुष्यची भेळ...

           तिने घरात येता बरोबर लगेच बॅग सोफ्यावर फेकून दिली. तिचं ते रुप त्यानं बघितलं आणि त्याला कळून चुकलं की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय. 
       "काय झालं, कुणाशी वाद वगैरे झाला का?"अगदी सौम्य भाषेत त्याने विचारलं.
    "हो, मला काय येतं दुसरं वादाशिवाय, मीच भांडत असते ना सगळ्यांशी".
"अगं मी वाद म्हंटलंं भांडण नाही".
"उगाच शब्द नको फिरवुस, वाद आणि भांडण फार वेगळं नाही".
"बरं !".
"हे बरं आहे मी काही बोलली की नुसतं 'बरं !' म्हणायचं आणि शांत बसायचं".
         ती बाथरूम मध्ये गेली फ्रेश झाली , आतून आवाज आला "ह्या फेसवॉश ला सुद्धा आताच संपायचं होतं. लिस्ट मध्ये होतं ना ! पण ह्या घरात मी पुढे पुढे केल्याशिवाय काहीच नीट नसते".
"अगंं ह्यावेळी तूच गेली होतीस सामान आणायला".
"हो का?, ते बरंं लक्षात राहीलंं".
"बरं !".
"सर्वात आधी हे बरं ! बरं ! , बंद कर तुझं".
"बरं ....सॉरी ....हम्मम्म्म".
"सगळी विचित्र माणसं माझ्याच आयुष्यात आहेत".
"तुला भूक लागली का, मी भेळ चा प्लान केलाय मस्त".
"मी खादाडच आहे ना ! भूक लागली की चिडचिड करते नाही का?".
"मी असंं काही म्हणालो नाही".
"उद्देश तर तोच होता".
"अस नाहीं गंं राणी काही".
"जाऊ दे , तू मला कधीच समजून नाही घेतलंस".
"बरं!".
ती सरळ बेडरूम मध्ये निघून गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली.
ह्याने तिला थोडा वेळ रडू दिलं तोवर त्याने छान भेळ तयार केली.
नंतर 2 प्लेट छान सजवल्या आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला.
"ऊठा राणी साहेब, ही बघा स्वादिष्ट भेळ तयार आहे".
"मला नको".
"हे चालणार नाही".
"नको म्हंटलंं ना !".
"जाऊ दे मग मी सुद्धा नाही खात".
"अरे तू खा , मला भूक नाही".
"बरं!, ही भेळ मी तुला समजावून सांगतो. आपलं आयुष्य आहे ना हे त्या शुभ्र कुरमुऱ्यां सारखं असतं, हळू हळू त्यात थोडे बालपणीचे शेव, चिवडा पडतो मग ,थोडं वेगळं वाटायला लागतं, त्यात आपण थोडा त्याचे मित्र मैत्रिणी घालतो उदाहरणार्थ कांदा, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे, मग आहों मिरची किंवा चटणी घालतो, हे म्हणजे त्या माणसांसारखंं असते जे सदैव आपल्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घेऊन येत असतात. पण त्यांना आपण टाळू शकत नाही, त्यांचा एखादा विचार पटत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्यात अजून तिखटाची भर घालावी, थोडं आपल्या विचारांचं मीठ घातलं की भेळ चवदार होते. तरीही जर का तिखटच वाटत असेल तर थोडं आपल्या स्वभावातील लिंबू पिळावं म्हणजे तिखटपणा राहत नाही समोरच्याच्या मनात सुध्दा नाही आणि आपल्या जिभेवर सुद्धा नाही. त्यावर मस्त पैकी आपल्या सुसंस्काराची कोथिंबीर भुरभुरावी मग कशी भेळ आणि जीवन दोन्ही चटकदार होते"

 ती हसत ऊठली त्याला बिलगली आणि पुन्हा रडली, "नको ती माणसे का येतात समोर?".

"आपण आपल्या मनाला इतकं का कमकुवत करायचं की कुणी एखादी व्यक्ती समोर आली तर असं हतबल होऊन जायचं...?!"
"भेळीत काय रोल असेल मग याचा".

*"सिम्पल आहे हे माणसं एकेकाळी आपलीच असतात, उदाहरण लिंबू पण ते पिळताना त्याची बी सुद्दा पडतेच भेळीत , मग ती जर का दिसली भेळ खातांना तर अलगद तिला बाजूला करायचं आणि भेळ खात बसायचं".*
"सो स्वीट 😊😊 आयुष्याची भेळ *
                  @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३. 

माझी इंजिनीअरिंग

माझ्या घरच्यांना मला, 
एका चांगल्या नोकरीला बघायचं होतं;
म्हणुनच मला Engineering ला,
admission घ्यायचं होतं.😄..

घेतले  admission मी Engineering ला,
आणि बघता बघता कॉलेज सुरु झाले;
शर्टावरचे 2 बटनं उघडे ठेवणाऱ्या मला,
आता फॉर्मल pant, टाय आणि ब्लेझर आले..😛

9 ते 5 कॉलेज करता करता,
दिवस कसा जायचा ते कळत नव्हतं;
आणि कॉलेजला काही सुंदर चेहेरे पाहिले,
की अभ्यासात लक्षच वळत नव्हतं...😍

पण तेव्हाच काही भारी मित्रांची,
साथ मला भेटत गेली;
Engineering करता करता,
दाढ़ी मिशी पण फुटत गेली..👨🏻

semester च्या end ला,
submission चं काम यायचं;
अन लिहून लिहून आम्हा सर्वांचं,
डोकं जाम व्हायचं.😤.

7 दिवसात 70 pages लिहिण्यासाठी,
 मँडम सरांचा दरारा होता;
लिहिता लिहिता गाने ऐकण्यासाठी,
headphones चाच सहारा होता..🎧

oral ला सर काय विचारतील,
 ह्याचा काही नेमच नसायचा;
अंधाऱ्यात तीर मारण्यासारखा,
 हा एक गेमच असायचा..😆

एवढं झाल्यानंतर पण,
theory exam येउन भिडायची;
सहा unit करता करता,
झोप आमची उडायची..😴

lectures ला टप्पे मारणारे आम्ही, 
Days Gathering ला रोज यायचो,..
नाव न सांगता एखाद्या मुलीला 
rose day ला rose द्यायचो..😋😘😘😍

डोळ्यात पानीपण यायचं,
जेव्हा result हातात यायचा;
मी जरी पास व्हायचो, ओ
पण मित्र drop ला जायचा.😔.

असा हा result दरवर्षी,
माझे जुने मित्र तोडत होता;😔
पण त्याच सोबत in होणारे,
काही नवे मित्र जोड़त होता..😄

वेळ जाता जाता,
निघून जात होती;
हसत,नाचत,रडत आमची,
 Engineering होत होती...😌

package कितीचे मिळेल आता,
ते आज सांगता येणार नाही;
पण चार वर्षांची Engineering ही,
मी कधीच विसरणार नाही
मी कधीच विसरणार नाही..😘
                 @स्वानंद ज्ञानेश आकसाळ. 
                  श्रीरामपूर, मो.७७०९९९७७८३. 

बाळकृष्ण...

#बाळकृष्ण  लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि "कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्य...