*आपली माणस....*
आवक झाली जास्त
अन माणसं झाली कमी
कोणतीच वस्तू देत नाही
सुख-शांतीची हमी !!
पॅकेज झालं मोठं
अन सुख झालं लहान
माणसाला माणसाचीच
लागली पाहिजे तहान !!
मोकळं चाकळं बोलण्यासाठी
पैसे थोडेच लागतात
कशासाठी आपली माणसं
अंतर ठेऊन वागतात !!
एवढं जग फिरतोस तू
मायेची माणसं भेटतात का
खांद्यावर हात ठेऊन
तुझ्याशी काही बोलतात का ?!!
सुबत्ता आली म्हणजे
पाय आपला घसरू नये
आपलं गाव आपली माणसं
कधीच कुणी विसरू नये !!
साहेब होणं सोपं असतं
माणूस होता आलं पाहिजे
बहीण अन भावासाठी
मन व्याकुळ झालं पाहिजे !!
ट्रेन सुद्धा म्हणे आता
' बुलेट ' सारखी होणार आहे
काय माहीत हरवलेली
मजा कधी येणार आहे !!
नकाशा तर तोच आहे
गाव का रे सापडत नाही
लपणा-छपनी, धप्पा-कुटी
काहीच कसं आठवत नाही !!
पोट भरण्यासाठी आपण
आपलं गाव सोडलं पाहजे
याचा अर्थ असा नाही की
नातं सुद्धा तोडलं पाहिजे !!
अरे फक्त पैशांनी
सगळीच प्रश्न सुटत नसतात
धीराचे शब्द देण्यासाठी
आपली माणसंच लागत असतात !!
@स्वानंद ज्ञानेश आकसाळ.

👌👌
ReplyDeleteThanks
Delete👌
ReplyDeleteThanks
Delete👌👌👌👍
ReplyDeleteखूप छान😊😍😍🤗
ReplyDelete👌
ReplyDeleteThanks
ReplyDeleteWonderful....
ReplyDeleteThanks
Deleteखूपच सुंदर
ReplyDeletethanks
DeleteOssum
ReplyDeletethanks
ReplyDelete